breaking-newsमनोरंजन

“बागी-3’मध्ये सारा अली खान?

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिने नुकतेच “केदारनाथ’मधून चित्रपटसृष्टीत पाउल ठेवले. या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे तिची सर्वत्र स्तुती होत आहे. “केदारनाथ’नंतर तिचा लवकरच आगामी “सिंबा’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता निर्माता साजिद नडियाडवाला यांनी आपल्या आगामी “बागी-3’साठी साराशी संपर्क साधला आहे.

“बागी’ सिक्‍वलच्या तिस-या भागातही टायगर श्रॉफ मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. यात आता टायगर आणि सारा यांचा रोमांस प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे दोन्ही सिक्‍वल बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. या चित्रपटाच्या पहिल्या सिक्‍वलमध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर, तर दुस-या सिक्‍वलमध्ये टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटणी यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.

या चित्रपटासाठी साजिद नाडियाडवाला यांनी सारासोबत बोलणी केली आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यात किती तथ्य आहे हे येत्या काळातच समजेल. दरम्यान, सारा सध्या तिच्या आगामी “सिंबा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंह झळकणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button