breaking-newsपुणे

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर पाठलाग करून गोळीबार

पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.  निलेश शेखर बिनावत (25)असे या मुलाचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास हांडेवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे हा प्रकार घडला. निलेशवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने गोळ्या बाजूने गेल्याने तो निलेश जखमी झालाय. निलेशन चपळाई दाखवत आपली लँड क्रुझर गाडी थेट हडपसर पोलिस ठाण्यात घातली. यामुळे त्याचा जीव वाचला, असं समजतंय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  टिपू पठाण या गुंडाने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केला. जवळपास दहा ते बारा जण दुचाकीवरून निलेशचा पाठलाग करत होते. टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्याची महंमदवाडी रोड परिसरात दहशत आहे. मात्र, गोळीबार का करण्यात आला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही. पण या प्रकारामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button