breaking-newsमहाराष्ट्र

शिवसेनेसोबत युतीचीच भाजपची भूमिका ; रावसाहेब दानवे यांचा दावा

बीड – शिवसेनेसह समविचारी पक्षांशी युती करण्याची भाजपची भूमिका आहे.  पक्ष संघटनेच्या बळावर आगामी निवडणुकीत भाजप उतरेल, असे राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ३६ मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी करावयाची प्रमुख २३ कामांपैकी बहुतांशी कामे पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी दिली जाईल. त्यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी केल्याचे दानवे म्हणाले.

बीड येथे शुक्रवारी खासदार दानवे यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, आर. टी. देशमुख यांची उपस्थिती होती. पक्ष संघटना लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. शिवसेनेसह समविचारी पक्षांबरोबर युती करण्याची भाजपची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार संरक्षण कायदा, जाहिरातींची शासनाकडील थकीत बिले यावर दानवे यांना या वेळी प्रश्न विचारण्यात आले, त्यावर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाईल, असे  त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button