breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेला ते मोहब्बत की दुकान म्हणतात का? नितेश राणेंचा सवाल

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार हे स्मशानात पोहचलं आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली होती. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. WHO मी पत्र पाठवणार आहे की त्यांनी संजय राऊत यांच्या जिभेचं संशोधन करावं, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे.

नितेश राणे म्हणाले की, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेला मी पत्र पाठवणार आहे की त्यांनी संजय राऊत यांच्या जिभेचं संशोधन करावं असं मी त्यांना सांगणार आहे. एखादा व्यक्ती चोवीस तास चाटुगिरी कशी करु शकतो? यासाठी संजय राऊतांच्या जीभेला दाद दिली पाहिजे. याबद्दल WHO ने संजय राऊतांच्या जिभेचं संशोधन करावं आणि देशाला सांगावं की अशी जीभ परत होऊ शकत नाही.

हेही वाचा – ‘महाराष्ट्र शाहीर’ ओटीटीवर रिलीज होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार

काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या चाटुगिरीचा जो उच्चांक संजय राऊतांनी गाठला आहे. त्यासाठी खरंच त्यांच्या जिभेचं संशोधन झालं पाहिजे. आज राहुल गांधींना सचिन तेंडुलकर, विराट कोहलीची उपमा दिली. मी त्यांना सांगू इच्छितो की राहुल गांधींची सचिन आणि विराटसह तुलना करण्याआधी या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उंचावली आहे. राहुल गांधी काही दिवसापासून अमेरिकेत जाऊन आमच्या भारत देशाची, हिंदू धर्माची बदनामी करत आहेत. संजय राऊतांना ते भांडुपमध्ये बसून समजतंय का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

राहुल गांधी म्हणतात मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ. त्यांच्या या मोहब्बतच्या दुकानात हिंदूंना जागा नाही. कर्नाटकमध्ये हिंदूंची काय अवस्था झाली आहे जरा बघा. राहुल गांधींच्या या दुकानात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा होतात, हिरवे झेंडे फडकवले जातात. या सगळ्यालाच ते मोहब्बत की दुकान म्हणतात का? असाही सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button