breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बहुत हुई जनता पर पेट्रोल-डीजल की मार, इंधन दरवाढीवरील मोदीचे पोस्टर व्हायरल

आज पेट्रोल 24 तर डिझेल 31 पैशांनी महागले.

पुणे  – पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. या दरवाढीने सर्वसामान्यांचे महागाई अक्षरशा कंबरडे मोडले आहे.  आज (सोमवारी) पुन्हा  इंधन दरवाढ झाल्याने बहुत हुई जनता पर पेट्रोल-डीजल की मार, अबकी बार मोदी सरकार हे पोस्टर सोशल मीडिया व्हायरल झाले आहे.  तसेच क्या आपको यह होर्डिंग याद है, असा सवालही त्यातून विचारला जात आहे. दरम्यान, आज पेट्रोल 24 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 31 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे पेट्रोलचा प्रतिलिटर दर   91.08  तर डिझेलचा प्रतिलिटर दर  79.71 झाला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये 1.95 रुपयांनी दर वाढविला आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी वाढविल्याने सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळीही महागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button