breaking-newsताज्या घडामोडी

ई बसेस आल्या, आता ई चार्जिंग स्टेशनची प्रतिक्षा, चीनमधील कंपनीची पालिकेला भेट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पीएमपीएमएलसाठी ई बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीनमधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने महापौर उषा उर्फ माई ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांची भेट घेवून त्यांना माहिती दिली.

यावेळी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, नगरसदस्य सुरेश भोईर आदी उपस्थित होते. यावेळी पथकाचे स्वागत महापौर ढोरे आणि स्थायी समिती समितीचे सभापती मडिगेरी यांनी केले.

या कंपन्या ई बसेस, ई चार्जिंग स्टेशन तयार करीत असून कंपन्याच्या संचालकांनी ई बसेस, ई वाहने, पीएमपीएमएल इलेक्ट्रीक वाहने इत्यादीकरीता ई चार्जिंग स्टेशन तयार करणाऱ्या या प्रकल्पासाठी चार्जिंग स्टेशनचे कामकाज करणार असल्याचे यावेळी सांगितले. त्या संबधीत सविस्तर माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली असून याबाबत लवकरच प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.

या शिष्टमंडळामध्ये झाओ झिनुआ, लि झिंग मिंग, रू योंग घेग, लियु युआन तसेच नागपूर येथील टॉपडोर कंपनीचे व्यवस्थापक डॉ. विशाल बाहेकर यांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button