breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्लीज आम्हाला गोळी मारू नका, पोस्टर्स व्हायरल

उत्तर प्रदेश – लखनऊमध्ये विवेक तिवारीची हत्या झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. लखनऊ, वाराणसीमधल्या अनेक गाड्यांवर विवेक तिवारी अमर रहे असे स्टिकर्स झळकले आहेत. तसेच सोशल मीडियावरही काही पोस्टर्स व्हायरल झाली आहेत. यात काही चिमुकलेही हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय.

या पोस्टर्सवर लिहिलंय की, तुम्ही गाडी थांबवण्यास सांगितल्यास बाबा गाडी थांबवलीत, प्लीज गोळी मारू नका. या प्रकारानंतर लखनऊमधले नागरिक भीतीच्या दडपणाखाली आहेत. ज्या पद्धतीनं विवेकला गाडी न थांबवल्यामुळे गोळी घालण्यात आली, त्यामुळे लहानग्यांपासून मोठ्यापर्यंतच्या मनात एका अनामिक भीतीनं घर केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी मृत विवेकच्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीत करून संवेदना व्यक्त केली आहे. तुमच्या कुटुंबीयांना शक्य होईल तेवढी मदत करेन, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button