breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हेच का अच्छे दिन, जनतेचा सवाल ; विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला

दिल्ली –  पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये 1.95 रुपयांनी दर वाढविला आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी वाढविल्याने सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळीही महागणार आहे.

केंद्र सरकराने आज वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना तिहेरी शॉक दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 59 रुपयांची वाढ केली. तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ करण्य़ात आली आहे.  तसेच विमानाच्या इंधनाचीही 2650 रुपये प्रतिकिलो लिटरला विक्री केली जाणार आहे. हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. एक किलो लिटरमध्ये 1000 लीटर इंधन मिळते.

सीएनजीची ही दरवाढ देशभरात लागू झाल्यास आज मध्यरात्रीपासून प्रती किलोला 46 रुपयांच्या आसपास सीएनजी विकला जाणार आहे. यामुळे आधीच महागाईने पिचलेल्या कारचालकांना तुलनेने स्वस्त असलेल्या सीएनजीच्या दरवाढीमुळे खिशाला कात्री लागणार आहे.  याआधी 1 एप्रिलला 77 पैशांची वाढ झाली होती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button