breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड

बहिणाबाई उद्यान टाकणार कात

पिंपरी –  संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान कात टाकत असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सूचनेनुसार बदल करण्यात येत असून, राष्ट्रीय मानकाप्रमाणे सरपटणारे, जलचर आणि उभयचर प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी कक्ष उभारणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे आदी कामे सुरू आहेत. नूतनीकरणामुळे संंग्रहालयाचे रूपडे बदलणार आहे. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीची ओळख बनलेले संभाजीनगर, चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान आहे. सन १९९७ मध्ये त्याची निर्मिती करण्यात आली. सात एकर क्षेत्रावर ते उभारले आहे. या ठिकाणी उभयचर आणि जलचर प्राण्यांसाठी अधिवासाची व्यवस्था नसल्याने येथील काही प्राणी कात्रजच्या उद्यानात हलविण्यात आले आहेत. तसेच उद्यानातील सर्पांचा मृत्यू, मगरीची पिले गायब होणे, प्राणी गायब होणे अशी प्रकरणे घडल्याने हे उद्यान चर्चेत आले होते. प्राणी आणि पक्ष्यांची सुरक्षा याबाबत नॅशनल झू अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया या संस्थेने पाहणी करून काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने याबाबतचा नूतनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या संदर्भातील कामाची निविदा २०१५ला प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राष्टवादी काँग्रेसची सत्ता असताना २० मे २०१६ ला कामाचे आदेश दिले होते. प्राणिसंग्रहालयात स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. या कामासाठी १४ कोटी ७ हजार ५२१ रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्राणिसंग्रहालयाचे काम वेगाने सुरू आहे. २०१६ मध्ये कामाचा आदेश दिला होता. विविध प्रकारची स्थापत्यविषयक कामे पूर्ण होत आली आहेत. आॅक्टोबर २०१८ पर्यंत कामाची मुदत आहे. नॅशनल झू अ‍ॅथोरिटीच्या सूचनेनुसार सर्व बदल केले आहेत. लवकरच संग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येईल.

– संजय कांबळे , (कार्यकारी अभियंता, उद्यान विभाग)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button