breaking-newsआंतरराष्टीय

पर्समधल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ला आग, विक्री थांबवण्याची मागणी

सॅमसंग कंपनीच्या गॅलेक्सी नोट 9 या लेटेस्ट स्मार्टफोनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सॅमसंग कंपनीविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला असून फोनची विक्री थांबवण्याची व नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे.

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, आयलंडच्या रहिवाशी डाइन चुंग नावाच्या एका महिलेने आपल्या पर्समध्ये ठेवलेल्या Samsung Galaxy Note 9 फोनला आग लागल्याचा दावा केला आहे. आग लागली त्यावेळी फोन पर्समध्ये ठेवला होता असं चुंग यांनी सांगितलं. 3 सप्टेंबरच्या मध्यरात्री लिफ्टमध्ये असताना फोनला आग लागल्याचं त्यांनी सांगितलं. फोन गरम झाल्याचं मला जाणवलं होतं, त्यामुळे थोड्यावेळासाठी फोन न वापरण्याचं मी ठरवलं आणि फोन पर्समध्ये ठेवून दिला. पण लिफ्टमध्ये असतानाच थोड्यावेळाने शिटी वाजण्यासारखा आवाज आला आणि पर्समधून धूर येताना दिसत होता. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, धुरामुळे काही निट दिसतही नव्हतं. लिफ्ट थांबताच मी फोन बाहेर फेकून दिला, तरीही फोन जळत होता. बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तो फोन कपड्याच्या सहाय्याने उचलला आणि पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये टाकला. तो खूप वाईट अनुभव होता. माझ्या कोणत्याही क्लाइंटला मला फोन करता आला नाही आणि पर्समध्ये फोन असताना आग लागल्यामुळे पर्समधील इतर सामान देखील खराब झालं. याशिवाय जळालेला फोन पर्सबाहेर काढताना माझी बोटं देखील भाजली, असं चुंग यांनी सांगितलं.

गॅलेक्सी नोट-9 लॉन्च करतेवेळी फोनमध्ये मल्टी स्टेप बॅटरी सेफ्टी चेक फीचर असून या फोनला आग लागू शकत नाही असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. यापूर्वी गॅलेक्सी नोट-7 मध्ये आग लागल्याच्या घटना वारंवार समोर आल्यानंतर कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, अखेर कंपनीने गॅलेक्सी नोट-7 चं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button