breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधी समितीकडून सहशहर अभियंता पदोन्नतीचा विषय तहकूब

सभेच्या अध्यक्षस्थानी विधी सभापती माधूरी कुलकर्णी होत्या. 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती समितीने (डीपीसी) सहशहर अभियंता पदी पदोन्नती दिली. याविषयी प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी विधी समितीसमोर ठेवला होता. आज (शुक्रवारी) झालेल्या विधी समितीच्या सभेत तो प्रस्ताव तहकूब ठेवला आहे. 

महापालिकेच्या विधी समितीची सभापती माधुरी कुलकर्णी या अध्यक्षस्थानी होत्या. विधी समितीच्या विषयपत्रिकेवर एकूण चार विषय होते. त्यातील तीन विषय मंजूर करण्यात आले.

महापालिकेत सहशहर अभियंत्याची तीन पदे मंजूर आहेत. स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील आणि विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे हे कार्यरत आहेत.  तर सहशहर अभियंता आयुबखान पठाण हे सेवानिवृत्ती झाल्याने त्याचे पद रिक्त झाले आहे. त्या रिक्त झालेल्या पदावर मकरंद निकम यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव आहे.  महापालिका पदोन्नती समिती (डीपीसी) आयुक्तांच्या समेवत बैठक पार पडली.  या बैठकीत कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सहशहर अभियंतापदी पदोन्नती देण्यास मान्यता दिली. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी विधी समितीपुढे ठेवण्यात आला. तो प्रस्ताव समितीने तहकूब ठेवला आहे.

तसेच अ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सार्वजनिक शाैचालये बांधण्यात येणार आहेत. यामध्ये लोकमान्य हाॅस्पीटल, गावडे काॅलनी, सुदर्शन नगर 11 ब्लाॅकमध्ये 41 सिट्सचे शाैचालये बांधण्यात येणार आहेत. मोहननगर, काळभोरनगर, विवेकनगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडीत 28 ब्लाॅकमध्ये 265 सिट्स इतकी सार्वजनिक शाैचालये बांधण्यात येणार आहे. तर निगडी गावठाण, आकुर्डी गावठाण 17 ब्लाॅकची 147 सिट्सची सार्वजनिक शाैचालये बांधण्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली.

याविषयी सभापती माधुरी कुलकर्णी म्हणाल्या की, महापालिका प्रशासन विभागाकडे अधिका-यांच्या पदोन्नतीबाबत नियमावली मागविली आहे. तसेच  ‘सहशहर अभियंतापदी बढती कशी दिली आहे. त्या पदावर कोणते आरक्षण आहे का? याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे हा विषय तहकूब ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button