breaking-newsराष्ट्रिय

बस 300 फुट दरीत कोसळून 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

सहलीवरुन परतणाऱ्या विद्यार्थ्यांची खासगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जखमी असल्याची माहिती आहे.  गुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी सहलीहून परतताना महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत ही बस कोसळली.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Gujarat: Death toll reached to 5 in Dang bus accident. A bus carrying more than 50 students fell into a deep gorge on Mahal-Bardipada route in Dang district, yesterday. (Earlier visuals)

बसमध्ये पहिलीपासून आठवी इयत्तेपर्यंतचे जवळपास 67 विद्यार्थी होते. महाल-बर्डीपाडा घाटात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अमरोली गावातील खासगी शिकवणी क्लासेसची ही बस होती. सर्व विद्यार्थी अमरेली येथील रहिवासी आहेत असं समजतंय. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव पथकाने स्थानिकांसोबत मिळून विद्यार्थ्यांना दरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button