breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भररस्त्यात महिलेचा विनयभंग करणा-या स्कूल बस चालकाला अटक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दुचाकी रस्त्याच्या बाजुला घेता येत नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने स्कूल बस चालकाने खाली उतरून दुचाकीवरील पती-पत्नीस शिवीगाळ करत मारहाण केली. पत्नी मध्यस्ती करताच त्यांच्या हाताची बोटे पिरगळून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत विनयभंग केला. याप्रकरणी स्कूल बस चालकाला चिखली पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शनिवारी (दि. 15) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिखलीतील मोरे वस्ती येथे घडला.

मधुकर रत्नाकर ढोले (रा. नेवाळे वस्ती, चिखली) याला अटक झाली आहे. विवाहितेने याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात वियभंग केल्याची तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीसह दुचाकीवर जात होत्या. त्यावेळी स्कूल बस चालक मधुकरने दुचाकी बाजुला घेण्यास सांगितले. समोर जागा नसल्यामुळे दुचाकी बाजुला घेता येत नसल्याचे महिलेच्या पतीने प्रत्युत्तर दिले. त्याची चीड आल्याने मधुकर बसमधून खाली उतरून महिलेच्या पतीसोबत शिवीगाळ करू लागला. मारहान करू लागल्याने महिला मध्यस्ती गेल्या. तेव्हा मधुकरने त्यांचा हात पकडून बोटे पिरगळून सोडली. जमावासमोर महिलेशी गैरवर्तन केल्याने माझा विनयभंग झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली. त्यानुसार मधुकरला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button