breaking-news

बस प्रवासात पावणे तीन लाखाचे दागिने लंपास

नाशिक | महाईन्यूज

बस प्रवासात महिलेच्या बॅगेतून चोरटय़ांनी सुमारे पावणे तीन लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना नाशिक-मालेगाव प्रवासात ही घटना घडली. या बाबत माधुरी त्रिभुवन (मालेगाव) यांनी तक्रार दिली आहे.

त्रिभुवन या मालेगावहून नाशिकच्या दिशेने एसटीने येत असतांना चोरटय़ाने आसनावरील पिशवीची चेन उघडून सुमारे दोन लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने असणारी पर्स चोरली आहे. त्यात सोन्याची पाटली, मोहनमाळ, ठुसी आणि अंगठी यांचा समावेश आहे. ही बाब आडगाव नाका येथे लक्षात आली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button