breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

समृद्धी महामार्ग कधी खुला होणार? लोकार्पणासाठी मोदी महाराष्ट्रात येणार

नागपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

समृद्धी महामार्गासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण, समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू-कामठी रोड मार्गाचे लोकार्पण एकत्रितरित्या करण्यात येणार आहे. या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी हा द्रुतगती मार्ग डिसेंबरअखेर तयार होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी जानेवारीतच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही प्रकल्पांचे एकत्रित उद्घाटन
समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो २ आणि ४ चे लोकार्पण एकत्रित करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम रखडल्याने मेट्रोच्या सेवेपासूनही नागपूरकरांना काही काळ वंचित राहावं लागणार आहे. मेट्रो रीच ४ (सेंट्रल एव्हेन्यू) फेब्रुवारीपासून तयार आहे. तर, मेट्रो रीच २ (कामठी रोड) सुद्धा काहीच आठवड्यांपूर्वी तयार झाला आहे. हे दोन्ही मार्ग खुले झाल्यास रस्त्यावरील वाहतूक बरीच कमी होणार आहे. मात्र, त्यासाठी नागपूरकरांना आता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम कुठवर आले?
५२० किलोमीटरच्या फेज १ पैकी ४९१ किलोमीटरचा नागपूर-शिर्डी रस्ता वाहतुकीसाठी सज्ज आहे. तर, नागपूर ते सेलू बाजारादरम्यान २१० किमी आणि मालेगाव शिर्डीदरम्यान २८१ किमीचा रस्ता तयार आहे. तर, बुलडाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर केवळ पुलाचे काम सुरू आहे. येथील पुलाचा एक कॅरेज वे नोव्हेंबरपर्यंत तयार होऊन तो दुतर्फा करण्यात येणार आहे. तसंच उर्वरित काम डिसेंबर पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button