breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कराडजवळ अपघातात तीन ठार, तीन जखमी

कराड | महाईन्यूज

पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीकच्या खोडशी गावाच्या हद्दीत भरधाव निघालेल्या टेम्पोने ऊस कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचालक व ट्रॅक्टरमधील दोघे जण असे एकूण तीन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना काल बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

पुट्टाप्पा जयाप्पा बेनकनशेट्टी (३५, टेम्पोंचालक, रा. आळगवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव), नामदेव किसन साखरे (४०, रा. तांदूळवाडी, ता. धारूर, जि. बीड), कृष्णत महादेव काळे (२८, रा. सरफराजपूर, जि. बीड) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. तर शांताराम अच्युतराव चव्हाण (३५), राजमती विष्णू काळे (२५), ताई विष्णू काळे (४, तिघेही रा. सरफराजपूर, जि. बीड) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या टेम्पोचा (क्र. केए २२, डी १८७८) खोडशी गावच्या हद्दीत आल्यानंतर चालक पुट्टाप्पा बेनकनशेट्टी याचा वाहनावरील ताबा सुटल्याने या टेम्पोने ऊस कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला (क्र. एमएच ४४, एस २८३१) पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पोचालक पुट्टाप्पा बेनकनशेट्टी व ट्रॅक्टरमधील नामदेव साखरे हे जागीच ठार झाले. तर कृष्णत काळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. मात्र, आज गुरुवारी सायंकाळी उपचार सुरू असताना कृष्णत काळे यांचे निधन झाले. तर ट्रॅक्टरमधील ऊसतोड कामगार शांताराम चव्हाण, राजमती काळे, ताई काळे हे जखमी झाले. या अपघाताने महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जखमींना हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, योगेश पवार, जितेंद्र भोसले यांच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले होते. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस कराड शहर पोलिसात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button