breaking-newsराष्ट्रिय

बनावट नोटांसाठी युट्युबचा वापर, चौघांना अटक

युट्युबवर दररोज अनेकजण व्हिडिओ पाहत आसतात. प्रत्येकवेळी चांगल्या कामासाठी वापर होईल असे नाही. चार जणांनी युट्युबवर पाहून बनावट नोटा छापण्याचा पराक्रम केला आहे. पोलिसांनी त्यांना त्याब्यात घेतले आहे. उत्तर प्रद्रेशमधील सहारणपूरमध्ये हा प्रकार घडला आहे.

सहारणपूरमधील आमिर, अफजाल, उपेंद्र आणि सुभाष या चार जणांनी युट्युबवर पाहून नकली नोटा छापल्या आणि या नोटा त्यांनी व्यवहारातही आणल्या होत्या. पण सुत्रांच्या मिळालेल्या महितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकत चार जणांना ताब्यत घेतले. त्यांच्याकडून साडे तीन लाख रूपयांच्या बनावट नोटांसह प्रिंटर, स्कॅनर आणि ५२ कागदे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारणपूरमधील खत्ताखेडीतील मोहम्मद नगरमधील एका घरातून चार जणांना बनावट नोटांसह अटक केली. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये अडीच हजारहून अधिक नोटा या शंभर रुपयांच्या आहेत. अटक करण्यात आलेल्आ चौघांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. तपासादरम्यान आपण युट्युबवरून नोटा छापण्याची पद्धत आत्मसात केली असे आरोपींनी कबूल केले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button