breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अशा नोटिसा देणं वगैरे परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती”, फडणवीसांना दिलेल्या नोटिशीवर अजित पवारांच्या कानपिचक्या!

मुंबई |

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या आरोपांसंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न बोलावता त्यांच्या घरी जाऊन बीकेसी पोलीस तपास करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सर्वच राजकीय नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या आहेत. पुण्यात आज अजित पवारांचे ३१ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सूस भागात एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

  • सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीनं वागावं…

अजित पवारांनी कार्यक्रमानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजपा आंदोलन करणार असल्याबाबत विचारणा करताच अजित पवारांनी भूमिका मांडली आहे. “प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीश कशामुळे दिली? माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावं. देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती…नोटिसा देणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं वगैरे. मी पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केलंय. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “यशवंतराव चव्हाणांनी जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, हे दाखवून दिलं आहे”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

  • लोकांना आरोप-प्रत्यारोपात रस नाही

दरम्यान, राजकीय नेतेमंडळींच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये लोकांना अजिबात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “लोकांना एकमेकांच्यावरचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. पुण्यात सूसमध्ये मी आज आलोय. इथल्या लोकांचं म्हणणंय आमचा पाण्याच, ड्रेनेजचा, विजेचा, स्मशानभूमीचा प्रश्न सुटावा. पण तो प्रश्न राहातो बाजूला. प्रत्येक वेळी कुणी ना कुणी काहीतरी वक्तव्य करतं. नोटिसा काढल्या जातात. माध्यमे देखील ही मतं दाखवतात. कृपा करून सगळ्यांनी वेळ घालवू नका. सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button