breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांना युवक कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त व देशाचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड युवक कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

पिंपरीतील अजमेरा काॅलनी येथे काँग्रेस पदाधिका-यांकडून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी इंदिरा व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना अशोक मोरे व नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटिबध्दतेची प्रतिज्ञा सामुहिक स्वरूपात घेण्यात आली.

या प्रसंगी अशोक मोरे म्हणाले, “इंदिरा गांधींनी देश घडवला. देशात विकासाचे नंदनवन फुलवले. देश सुरक्षेच्या बाबतीत , कृषी क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात तसेच अर्थिक नियोजनाच्या बाबतीत देश सक्षम केला. प्रसंगी प्राणांची पर्वा न करता कठोर निर्णय घेतले. जागतिक स्तरावर देशाची मान उंचविण्याचे काम इंदिरा गांधींनी केले. ख-या अर्थाने इंदिरा गांधींनी भारतमातेच्या भूमिकेत भारताचे संगोपन केले.”

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक मंगल, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासिर चौधरी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button