breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य निघाले सिक्कीम दाै-यावर

पिंपरी- महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य व अधिकारी हे पुढील मे महिन्यात तीन दिवसीय सिक्कीम दैा-यावर निघाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव मांडला. त्या दाै-याला  येणा-या नऊ लाख 53 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या काळात दौरे बंद होतील, अशी अपेक्शषा नागरिकांना होती. परंतु, सत्ताधारी भाजपच्या काळातही दौरे सुरुच आहेत. यामध्ये महापौर नितीन काळजे हे नोव्हेंबर महिन्यात युरोपमधील स्पेन देशाच्या दौ-यावर जाऊन आले. त्यानंतर आयुक्तदेखील स्वीडनच्या दौ-यावर गेले होते. महिला व बालकल्याण समितीचे सात सदस्य जून 2017 मध्ये सिंगापूर दौ-यावर जाऊन आले. अलीकडेच 9 व 10 एप्रिलला महिला बालकल्याण समितीच्या सदस्य केरळ दौरा करुन आले आहेत. पालिकेतील सर्व नगरसेवक आणि अधिका-यांनी गुजरातचा दौरा केला आहे.

आता वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य आणि अधिकारी 3 ते 8 मे दरम्यान सिक्कीमच्या तीन दिवसीय अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यासाठी एका व्यक्तीला प्रत्येकी 45 हजार 850 रुपये खर्च येणार असून 20 जण दौ-यामध्ये सहभागी होणार आहेत. पालिकेने तीन ट्रव्हॅल अॅन्ड टुर्सकडून दरपत्रक घेतले होते. त्यामध्ये सर्वात कमी दरपत्रक मे.युनिर्व्हसल टूरीझम यांचे आहे. त्यानुसार प्रति माणशी 45 हजार 850 असे एकूण 20 व्यक्तीसाठी अंदाजे नऊ लाख 13 हजार खर्च येणार आहे. फोटोग्राफी आणि उद्यानाचे प्रवेश शुल्क इत्यादींसाठी 40 हजार रुपये असे दौ-यासाठी येणा-या नऊ लाख 53 हजार रुपये खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button