breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

‘मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं’ – अबू आझमी

मुंबई | महाईन्यूज

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सीएए आणि एनआरसी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

ठाणेतील मुंब्रा इथं सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी अबू आझमी बोलत होते. अबू आझमी म्हणाले, “आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचं सर्टिफिकेट दाखवावं”, असं आव्हान अबू आझमींनी दिलं आहे.

देशावर मोठी आपत्ती कोसळली आहे. भारतीय संविधानापुढे मोदी लहान आहेत. ज्यांनी देशाला संविधान दिलं त्यांचे संविधान बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असा टोकाचा आरोप अबू आझमींनी केला.

अबू आझमी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे 35 पदव्या होत्या. मोदी एक चहावाले होते. त्यांच्यासोबत जो दुसरा व्यक्ती आहे (अमित शाह), या देशाचं दुर्दैव आहे की, ज्या खुर्चीवर सरदार वल्लभभाई पटेल बसले होते, आज त्या खुर्चीवर ज्याला गुजरातच्या जेलमध्ये ठेवलं होतं, ज्याला तडीपार केलं होतं, तो बसला आहे, असंही अबू आझमी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button