breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बडोद्यात बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी; बचावकार्य सुरू

गुजरातमधील बडोद्यातील बावामाणपुरा परिसरात तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम सुरू होते आणि आधीपासून एका बाजूला झुकलेली होती. याबाबत लोकांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button