breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : दर्शना पवार खून प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक

पुणे : राजगड किल्ल्याच्या परिसरात झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संशयित आरोपी राहुल हंडोरे यास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना अटक केली आहे. त्यामुळे दर्शना पवार खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दर्शना पवार एमपीएससी परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झालेली होती. १२ जून रोजी ती आपल्या मित्र राहुल याच्यासोबत राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. विशेष म्हणजे या दिवसापासून राहुल हंडोरे फरार होता. त्यामुळे खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिस पथके संशयित राहुल हंडोरेच्यामागावर होती. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा करसंकलन विभाग ॲक्शन मोडवर; निव्वळ ऑनलाइन भरणा सव्वादोनशे कोटी

शवविच्छेदन अहवालामध्ये दर्शनाच्या डोक्यावर तसेच शरीरावर जखमांच्या खुना आढळल्या आहेत. या जखमा या किल्ल्यावरून पडून झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले होते. तिला कोणत्यातरी वस्तूने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या तपासात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्शना आणि राहुल हे दोघे किल्ल्याच्या दिशेने जाताना पाहावयास मिळाले. मात्र, ते परतत असताना केवळ राहुल हा दुचाकीवर आल्याचे दिसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button