breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अभियांत्रिकी कारणासाठी मध्य रेल्वेवर उद्या (२८ जून) मेगा ब्लॉक,जलद मार्गावरच्या गाड्या धीम्या मार्गावरून धावणार

अभियांत्रिकी कारणासाठी मध्य रेल्वेवर उद्या म्हणजे रविवारी २८ जून रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे जलद मार्गावर धावणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईत लोकलसेवा बंद आहे. मात्र गेल्या महिन्यापासून अत्यावश्यक सेवेसाठी लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या. या लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारे आणि राज्य सरकारी कर्मचारी प्रवास करू शकतात. त्यामुळे अभियांत्रिकी कारणासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १०.३० ते ३.३० वाजेपर्यंत हा विद्याविहार ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.१६ ते २.१७ पर्यंत डाऊन जदल मार्गावरून सुटणाऱ्या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येणार असून पुढे जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तर, अप जलद मार्गावरील दुपारी १२.४१ वाजता सुटणाऱ्या गाड्या मुलुडं ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. शिवाय, नियोजित वेळेनुसार धावणाऱ्या काही ठाणे आणि कल्याण लोकल रद्द करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, ठाणे ते विद्याविहार दरम्यान धावणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात आल्या आहेत.

सकाळी १०.०५ ते ४.०५ पर्यंत हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यानही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.सकाळी ९.४५ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत कोणतीही गाडी धावणार नाही. तर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button