breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा

मराठा किंवा खुल्या प्रवर्गाची सवलत घेण्याची मुभा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा आयोगाने दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यंदा (राज्यसेवा २०१८) विविध गटातील ३३९ पदे असून त्यातील १६९ पदे ही ‘अ’ गटातील आहेत. पूर्वपरीक्षेचे अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत देण्यात आली असून १७ फेब्रुवारीला पूर्वपरीक्षा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. मात्र हे ऑनलाईन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगोगाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना मराठा समाजातील मुलांना सामाजित व शैक्षणिकदृष्ट्या मागास(एसईबीसी)ची नोंद करताना त्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले जाते. मात्र हे प्रमाणपत्र उमेदवारांना त्यांच्या मुळ गावीच काढणे बंधनकारक असल्याने त्यांची पर्तूता करून एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळविण्यास अडचणी येत असल्याने काही उमेदवारांनी खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. तेथेही हिन्दु मराठा असा अर्जात उल्लेख करताच  एसईबीसीच्या प्रमाणपत्राची मागणी  होत असून त्यापुढे अर्जच भरता येत नसल्याने उमेदवार हवालदील  झाले आहेत. आयोगाने दखल घेत मराठा समाजातील मुलांना त्यांची वर्गवारी स्वत:च्या स्तरावर बदलण्याची सुविधा दिली आहे. ऑनलाईन अर्जप्रणालीवरीस उमेदवाराच्या खात्यामधील अराखीव असे नमुद केलेला दावा एसईबीसी प्रवर्गामध्ेय उमेदवारांना स्वत:च्या स्तरावर  बदला येईल.  बदल करताना उमेदवाराला सद्यस्थितीत जातीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक, जिल्हा, दिनांक इत्यादी तपशील नमुद न करता वर्गवारी तात्पुरत्या स्वरूपात बदलता येईल. त्यासाठी उमेदवाराने राज्यातील अधिवासाबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अधिवासाचा दावा ‘होय’ असेल तरच वयोमर्यादेतील आणि परीक्षा शुल्कातील सवललतींचा फायदा घेता येईल . त्यामुळे जातप्रमाणत्र नसलेल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातून अर्ज भरता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button