breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पक्षप्रेमापोटी विसरले भान, विठ्ठल दर्शनाची लागली तहान ! नगरसेवक मयूर कलाटे यांची विठ्ठलभक्ती

  • मुंबईत जाऊन घेतली शरद पवार यांची भेट
  • कठीण काळात सदैव सोबत असल्याचे सांगितले

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली. ईडीच्या चौकशीला शरद पवार काल शुक्रवारी सामोरे जाणार होते. परंतु, ईडी सुध्दा पवार यांच्यासमोर झुकल्याने तुर्तास चौकशी केली जाणार नसून पवार यांनी ईडी कार्यालयात येऊ नये, अशी सूचना पवार यांना मेलद्वारे दिली होती.

त्यावर पवार यांनी सुध्दा कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत कारवाईला जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर साहेबांवरील प्रेमापोटी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी मुंबईत जाऊन पवार यांची भेट घेतली. कठीण काळात सदैव तुमच्या पाठिशी असल्याचे त्यांनी यावेळी साहेबांना सांगितले. साहेबांनीही त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे यांनी पवार यांना विठ्ठलाची मुर्ती भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार विद्या चव्हाण उपस्थित होते.

मी सदैव साहेबांसोबत – मयूर कलाटे

नगरसेवक कलाटे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या कुटुंबाशी पवारांचा दिर्घकालीन सलोखा आहे. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे. पक्षाकडे तिकीटाची मागणी देखील केली आहे. त्यासाठी पक्षाकडे मुलाखतही दिली आहे. साहेबांनी तरुणांना संधी देण्याचे सुतोवाच केल्यामुळे कलाटे यांच्या आपेक्षा वृध्दींगत होणे वावगे ठरणार नाही. तरी, ईडीची चौकशी, भाजपकडून पवार कुटुंबियांना दिला जाणारा त्रास याचा विचार करता कलाटे यांनी बांधिलकी समजून पवार कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसे त्यांनी जाहिर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button