breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेनं करुन दाखवलं, मुंबई तुंबली ; महापालिकाच बरखास्त करण्याची विधानसभेत मागणी

  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई –  मालाड येथे भिंत कोसळूम मृत्यू झाल्याबद्दल दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. पावसाची स्थिती हाताळण्यास मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. नियमांची पायमल्ली होत आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे. नाले सफाई दौऱ्यांचाही काही उपयोग झालेला नाही. गरज असेल तर महापालिकेवर प्रशासक नेमा असे म्हणत आक्रमक झालेल्या अजित पवार यांनी यावेळी मुंबई महानगरपालिकाच बरखास्त करा अशी मागणी केली.

दौऱ्यांचाही काही उपयोग झालेला नाही. गरज असेल तर महापालिकेवर प्रशासक नेमा असे म्हणत आक्रमक झालेल्या अजित पवार यांनी यावेळी मुंबई महानगरपालिकाच बरखास्त करा अशी मागणी केली. मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांचे पडसाद मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या विषयावरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.

मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांचे पडसाद मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या घटनांसाठी राज्य सरकारला धारेवर धरत आरोप केले. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या स्थितीला मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. यानंतर विधानसभेत मुंबईतील पावसानंतर निर्माण झालेल्या चर्चेवर विशेष चर्चा घेण्यात आली.

विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पावसानंतरच्या स्थितीवरून सरकारला धारेवर धरले. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या स्थितीला मुंबई महानगरपालिका जबाबदार असल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. या वेळी कोंढव्यात निरपराध लोकांचे बळी गेल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

एसआरए, पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा- भुजबळ

मालाड दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केली. या दुर्घटनेला महानगर पालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत का, तसेच एसआरएचे अधिकारी जबाबदार आहेत का, याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी भुजबळ यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button