breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बंगळुरूमधील तंत्रज्ञान कंपनीने तयार केले विजेशिवाय चालणारे आणि स्वस्त किंमतीचे व्हेंटिलेटर्स

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हेंटिलेटर्स तयार करण्यामध्ये बंगळुरूमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीने महत्त्वाचे काम केले आहे. विजेशिवाय चालणारे आणि स्वस्त किंमतीचे व्हेंटिलेटर्स या कंपनीने तयार केले आहेत. ज्याचा कोरोनाबाधित रुग्णांना नक्कीच उपयोग होऊ शकतो.

बंगळुरूस्थित डायनामॅटिक टेक कंपनीने हे व्हेंटिलेटर्स तयार केले आहेत. त्याची किंमत प्रति व्हेंटिलेटर २५०० रुपये ठेवण्यात आली आहे. वास्तविक ही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ऑटोमोटिव्ह, एअरोनॉटिक आणि सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित उच्च तंत्रज्ञानाच्या उपकरणांची निर्मिती करते. पण या कंपनीने देशापुढील आव्हान ओळखून नवे व्हेंटिलेटर्स तयार केले आहेत. 

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या नव्या उत्पादनाबद्दल कंपनीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले आहे की, हे नवे उत्पादन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वरदानच आहे. छोट्या रुग्णालयांसाठीही हे उत्पादन उपयुक्त ठरणार आहे. अनेकांचे जीव वाचविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

या नव्या व्हेंटिलेटरसाठी विजेची अजिबात गरज नाही. कोणत्याही घटकाचे आयात करण्याची गरज नाही. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक घटकाचीही यासाठी गरज नाही. या व्हेंटिलेटरमध्ये कमाल आणि किमान दाब नियंत्रित करता येतो. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने करता येतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button