breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

पहिल्या आशियाई सुवर्णपदकासाठी हीना सिधू सज्ज

  • जकार्ता आशियाई क्रीडास्पर्धेसाठी कसून सरावाला सुरुवात

भोपाळ:विश्‍वचषक, राष्ट्रकुल, तसेच अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला सहा सुवर्णपदके मिळवून देणारी भारताची अव्वल महिला नेमबाज हीना सिधू हिने आगामी आशियाई क्रीडास्पर्धेत आपले पहिले सुवर्णपदक मिळविण्याच्या दृष्टीने सरावाला सुरुवात केली आहे. आशियाई क्रीडास्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हीनाला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.

पुढील महिन्यात जकार्ता येथे होत असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेंच्या दृष्टीने हीनाने भोपाळ येथील मध्यप्रदेश शूटिंग ऍकेडमीमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. यामध्ये ती आपल्या खेळातील प्राथमिक तंत्रावर काम करणार असून त्याद्वारे ती आपल्या खेळात बळकटी आणणाऱ्या तंत्रावर देखील अभ्यास करणार आहे. ज्यात ती दिवसातील आठ ते नऊ तास सराव करत आहे.

आपल्या तयारीबद्दल बोलताना हीनाने सांगितले की, सध्या मी माझ्या पायाभूत तंत्रावरच भर देणारा सराव करत असून पुढील महिन्यात होणाऱ्या शिबिरात स्पर्धेच्या वेळी येणार दबाव कशा प्रकारे हाताळता येईल याचा मी अभ्यास करणार आहे. हीनाने याच वर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये 10 मी. एअर रायफलच्या सांघिक प्रकारात सुवर्ण, तर 10 मी एअर रायफलच्या वैयक्‍तिक प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. तिच्या या कामगिरीमुळे आगामी आशियाई क्रीडास्पर्धे तिच्याकडून 10 मी एअर रायफल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.

हीनाची प्रमुख पदके
विश्‍वचषक स्पर्धा 2013- सुवर्णपदक,
विश्‍वचषक स्पर्धा 2017- सुवर्णपदक,
विश्‍वचषक स्पर्धा 2009- रौप्यपदक,
विश्‍वचषक स्पर्धा 2014- रौप्यपदक,
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2010- सुवर्णपदक,
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2018- सुवर्णपदक,
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा स्पर्धा 2010- रौप्यपदक,
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा स्पर्धा 2018- रौप्यपदक,
आशियाई नेमबाजी स्पर्धा 2015- सुवर्णपदक,
राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा 2017- सुवर्णपदक,
आशियाई क्रीडास्पर्धा 2010- रौप्यपदक,
आशियाई क्रीडास्पर्धा 2014- कांस्यपदक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button