गोवा पाठोपाठ मणिपूरही कोरोना मुक्त राज्य
देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असतानाच गोवा पाठोपाठ आता मणिपूरमधूनही एक दिलासादायक बातमी आहे. मणिपूरही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुक्त राज्य झाले आहे. यापूर्वी गोवा राज्य रविवारी कोरोना मुक्त झाले आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह म्हणाले की,” मणिपूर हे आता कोरोना मुक्त राज्य झाल्याची माहिती सांगताना खूप आनंद होत आहे. दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही. “
यापूर्वी गोवा देशातील पहिले कोरोना विषाणू मुक्त राज्य ठरले होते. येथील सर्व रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-१९ चे सर्व सात रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सर्वांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी याची माहिती दिली होती. सावंत यांनी याबाबत टि्वटही केलं होत…
आनंददायक आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे अखेरच्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टर आणि सहायक कर्मचाऱ्यांसाठी ही कौतुकाची बाब आहे… गोव्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.