breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना ५ लाखांपर्यंत पैसे काढण्याची मुभा

 

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) छोट्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता ५ लाखांपर्यंतच्या ठेवी काढण्याची आणि नवीन ठेवी ठेवण्याची मुभा मिळाली आहे. पीएमसी बँकेच्या विलिनीकरणानंतर युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने (युएसएफबी) ही घोषणा केली. आता या बँकेत नवीन ठेवी ठेवणाऱ्यांना वार्षिक ७ टक्के व्याज दिले जाणार आहे. युएसएफबीच्या या निर्णयामुळे बँकेच्या ९६ टक्के ठेवीदारांचा पैसे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीएमसी बँकेचे युएसएफबीमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रक्रियेला २५ जानेवारीला केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली. बँकेचे ठेवीदार आणि कर्जदार यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला. या विलीनीकरणानंतर पीएमसी बँकेचे १,१०० पेक्षा अधिक कर्मचारी आणि ११० युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन झाल्या आहेत. आता ते नव्या बँकेचे कर्मचारी झाले आहेत. या विलीनीकरणानंतर युएसएफबीने बँकेच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे संपूर्ण पैसे काढून घेण्याची मुभा दिली आहे. याशिवाय नवीन ठेवी ठेवण्याचीही परवानगी दिली आहे. याचा फायदा बँकेच्या ९६ टक्के छोट्या ठेवीदारांना होणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून बँकेत पैसे अडकलेल्या पीएमसीच्या हजारो ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button