breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरातील चकमकीत सीआरपीएफचा जवान शहीद

श्रीनगर – काश्‍मीरात पुलवामा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. या घटनेच्या संबंधात माहिती देताना संबंधीत सूत्रांनी सांगितले की काल रात्री पुलवामा शहराच्या मोहल्ला टाकिया भागात चिनार बाग येथे काही संशयीत दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या भागाला वेढा देऊन त्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. ज्या घरात हे दहशतवादी लपले होते तेथे झडती

घेतली जात असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने त्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. याच दहशतवाद्यांच्या गोळीबारात बशिर अहमद नावाचा घरमालकही जखमी झाला आहे. शहीद झालेल्या जवानाचे नाव मंदीपकुमार असे असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना तो मरण पावला. नंतर दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याने तेथील ही शोध मोहीम काल सकाळी थांबवण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button