breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : सेरेनाची दुखापतीमुळे माघार
पायाच्या टाचेच्या दुखापतीमुळे सर्वोत्तम महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने सध्या सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. सेरेनाची बुधवारी दुसऱ्या फेरीतील लढत होती. मात्र त्या लढतीपूर्वीच तिने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. ‘‘२०२० या उर्वरित वर्षांत खेळू शकेन की नाही याबाबत शंका आहे. दुसऱ्या फेरीच्या लढतीपूर्वी सरावही केला होता. मात्र त्याच वेळेस सामन्यातून माघार घ्यावी लागेल हे जाणवले होते. पुढील चार ते सहा आठवडे मला विश्रांती घ्यावी लागेल,’’ असे ३९ वर्षीय सेरेनाने म्हटले आहे.