breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

नंदूरबारमध्ये दहा दिवसांत केवळ एका कोरोनाबाधिताची नोंद

नंदूरबार – महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. विदर्भात तर नागपूरनंतर नंदूरबारची कोरोना रुग्णसंख्या प्रचंड घटली आहे. नंदूरबारमध्ये मागील दहा दिवसांत केवळ एका कोरोना रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे नंदूरबारकरांमध्ये अत्यंत दिलासादायक वातावरण आहे.

गेल्या महिनाभरापासून नंदूरबार जिल्ह्यात दैनंदिन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर होती. त्यातच उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र आता दहा दिवसांनी जिल्ह्यात पुन्हा एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. नंदूरबार शहराच्या श्रीजी पार्क भागातील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील निर्बंधदेखील कमी करण्यात आले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button