breaking-newsक्रिडा

फिरकीपटू नईम हसनचा अनोखा विक्रम

चितगाव – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये बांगलादेशचा 17 वर्षीय फिरकीपटू नईम हसन याच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिज 246 धावत सर्वबाद केले आहे. नईम हसन याने 61 धावा देत 5 गडी बाद केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.

दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या बांगलादेशचा निम्मा संघ 55 धावात गारद करून वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन केले आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 324 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 246 धावात सर्वबाद झाला. या डावात पाच बळी मिळविणारा नईम 17 वर्षे 355 दिवसांचा असून अशी कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या दिवसाखेर बांग्लादेशकडे 133 धावांची आघाडी असून त्यांचे पाच फलंदाज बाकी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button