breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : फुटबॉलपटू पालकांचा गुणवान पुत्र

बेल्जियममधील ब्रेने-ली-कॉम्टे या छोट्या शहरात राहणाऱ्या फुटबॉलपटू आई-वडिलांचा एडेन हा आवडता पुत्र. बालपणापासून आपल्या पालकांचे गुण घेऊन फुटबॉलचे मैदान गाजविणाऱ्या एडेनची कीर्ती लवकरच सर्वदूर पसरली आणि लिले या प्रख्यात फ्रेंच क्‍लबने त्याला वयाच्या केवळ 14व्या वर्षी करारबद्ध केले. आपल्या अंगभूत गुणांनी झपाट्याने आगेकूच करणाऱ्या एडेनने वयाच्या केवळ 16व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले.

लीगमध्ये दोन वेळा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या एडेनकडे 2012 मध्ये पहिली सुवर्णसंधी चालून आली आणि चेल्सी क्‍लबने सव्वाचार कोटी डॉलर्सला त्याला करारबद्ध केले. एडेन हॅझार्डचा लौकिक पाहता आजच्या काळात ही रक्‍कमही अगदी मामुली वाटते. आज एडेन बेल्जियमच्या “गोल्डन जनरेशन’चे प्रतिनिधित्व करीत आहे. इतकेच नव्हे तर बेल्जियमने जपानवर 0-2 अशा पिछाडीवरून मिळविलेला विजय किंवा उपान्त्यपूर्व फेरीत ब्राझिलवरील विजयात त्याने बजावलेली भूमिका बाहता उद्या फ्रान्स संघासमोर सर्वात मोठा अडथळा एडेनचाच असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button