breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

फाशीविरुद्ध आता आंतरराष्ट्रीय कोर्टात गेले निर्भयाचे दोषी

नवी दिल्ली | निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशी प्रकरणामध्ये आता आणखी एक वळण लागले आहे. देशात फाशी रोखण्यासाठी सर्वच पर्याय संपले असताना आता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली. दोषी पवन, अक्षय आणि विनय या तिघांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये याचिका दाखल केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्लीच्या निर्भयाच्या अमानुष हत्या आणि बलात्कार प्रकरणी तिच्या 4 दोषींना 20 मार्च रोजी फासावर लटकवले जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने 23 मार्च रोजी गृहमंत्रालयच्या अपीलवर सुनावणी घेणार आहे. यामध्ये निर्भयाच्या दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी म्हटले होते, की दोषींनी सगळ्या सिस्टिमची थट्टा केली आहे. या प्रकरणी 15 फेब्रुवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते, की दोषींना वेगवेगळी फाशी देण्यासंदर्बात दोन याचिका प्रलंबित आहेत.

याचा कनिष्ठ न्यायालयाकडून जारी केल्या जाणाऱ्या डेथ वॉरंटवर काहीच परिणाम होणार नाही. जस्टिस आर भानुमती, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एएस बोपन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले होते, की “आम्ही स्पष्ट करू इच्छितो की याचिका प्रलंबित असल्याने सत्र न्यायालयाच्या निकालात काहीच अडचण येणार नाही. कोर्ट याचा निर्णय आपल्या विवेकाने घेऊ शकते.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button