breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर

मुंबई – ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला होता. 56 हजार 200 रुपये प्रति तोळा झालेल्या सोन्याच्या किमती तब्बल 13000 रुपयांनी स्वस्त होऊन 43 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या. परंतु आता या किमतींमध्ये हळूहळू परत एकदा वाढ होत असताना पाहायला मिळत आहे.

काल संध्याकाळी मार्केट बंद होत असताना सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 290 रुपयांची वाढ झाली असून मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी आता 44 हजार 200 रुपये प्रति तोळा एवढा दर लागू असणार आहे. तसेच 24 कॅरेट सोन्यासाठी 45 हजार 200 रुपये प्रति तोळा एवढा दर आकारण्यात येणार आहे. हे सुधारित दर काल बाजार बंद होतानाचे आहेत.

चांदीच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नसून फेब्रुवारीच्या तुलनेत चांदीच्या किमती 2 हजारांनी कमी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा दर हा 67500 इतका होता, तर काल मार्केट बंद होताना हा दर 65000 रुपये प्रती किलो एवढा खाली गेल्या दीड महिन्यात आलेला दिसतो.

एमसीएक्स हे देशातील सर्वात मोठे कमॉडिटी मार्केट असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव ठरवण्यात येतो. केडिया कमोडिटीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया यांनी काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने आयात शुल्कात 2.5 टक्के कपात जाहीर केल्यामुळे त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या बाजारावर थेट दिसून येत असून येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती 42500 रुपयांपर्यंतही खाली येऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button