breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

54 % भारतीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘Work From Home’ शक्यच नाही

कोरोना विषाणूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’  म्हणजेच घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे  कर्मचारी घरून काम करत आहे. मात्र भारतात ‘वर्क फ्रॉम होम’ही संकल्पना राबवणं म्हणावं तितकं शक्य नाही. जवळपास ५४%  भारतीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्यच नाही असं गार्टनर या अग्रगण्य आयटी सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनीच्या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. 

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्य आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टसारखे कर्माचारी  व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा अन्य सॉफ्टवेअरच्या मदतीनं घरून काम करु शकतात. मात्र आयटी क्षेत्र वगळता अन्य लहान मोठ्या  कंपन्यांच्या बाबतीत ‘वर्क फ्रॉम होम’चा विचार केला तर ते जवळपास अशक्यप्राय गोष्ट  आहे.

जुने कॉम्प्युटर असणे किंवा लॅपटॉप उपलब्ध नसणे, इंटरनेट स्पीडची कमी यांरख्या अनेक कारणांमुळे या कर्मचाऱ्यांना काम करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाशी निगडीत आधुनिक सॉफ्टवेअरची माहिती नाही असंही  या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे, त्यामुळेही घरून काम करायला सांगण्यास कंपन्यांना अडचणी येत आहेत. 
याव्यतीरिक्तही काही अडचणी आहेत.

भारतात अनेक कंपन्या काम करण्यासाठी ठराविक प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात, ही सॉफ्टवेअर फारच खर्चिक आहेत त्यामुळे ती केवळ ऑफिसच्या कॉम्प्युटरवरच सुरु होऊ शकतात असंही निदर्शनास आलं आहे त्यामुळे काही जणांच्या घरी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असूनही त्यांना सॉफ्टवेअरमुळे घरून काम करणं  शक्य नाही. ऑफिसमध्ये इंटरनेटचा स्पीडही तुलनेनं खूप जास्त आहे , तसा स्पीड घरी असणंही शक्य नाही म्हणूनही घरून काम करण्यास अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button