breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

फटाकेयुक्त अननस खाल्ल्यानं मृत्यू झालेली गर्भवती हत्तीण 14 दिवस होती उपाशी, शवविच्छेदनातील अहवाल

फटाकेयुक्त अननस खायला दिल्यानं केरळमधील एका गर्भवती हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्तीणीचा शवविच्छेदन अहवाल आता आला असून त्यात ही हत्तीण 14 दिवस उपाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तिच्या फुफ्फुसात पाणी शिरून तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटलं आहे.
 

केरळच्या पलक्कड येथे स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्यामुळे झालेल्या हत्तीणीच्या मृत्यूबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी देशभरातील लोकांनी केवळ शोक व्यक्त केला नाही, तर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबावही आणला. बर्‍याच जणांनी अशा क्रूर कृत्यासाठी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मानव विरुद्ध इतर प्राणी असे बनलेल्या या प्रकरणात आता आणखी एक नवीन भयानक गोष्ट समोर आली आहे.

या हत्तीणीच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती अत्यंत वेदनादायक आहे. तोंडात स्फोट झाल्यामुळे आणि जबड्याला नुकसान झाल्यामुळे या हत्तीणीला अतिशय असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. तसेच मृत्यूच्या 14 दिवस आधी तिने काहीही खाल्ले नव्हते. या काळात तिला काहीही खाणे, पिणे शक्य नव्हते. पाण्यात जाण्यापूर्वी भूक आणि तहान लागल्यामुळे तिने गावात अनेक फेऱ्या मारल्या. तोंडा फटाके फुटून दुखापत झाली असतानाही वेदना होत असतानाही तिने कोणालाही इजा केली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच जात असताना तिने कोणच्याही घराचे नुकसान केले नाही. तिच्यात किती चांगुलपणा होता हेच यातून दिसते आहे, असे अधिकारी म्हणाला.

हत्तीणीच्या शवविच्छेदन अहवालात ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूचे मुख्य कारण देखील फुफ्फुसातील पाणी जाणे हे असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसात पाणी शिरल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तसेच अननस खाल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिचा जबडा तुटला होता आणि तिला काहीच खाता येत नव्हते.

केरळ सरकारला या प्रकरणातल्या एका  आरोपीला पकडण्यात यशही आलं आहे..त्यामुळे या प्रकरणातील बाकीच्या आरोपींनाही पकडण्यात केरळ सरकारला नक्कीच यश मिळाव हीच सदिच्छा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button