breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

या कालावधीत भारतात उपलब्ध होणार कोरोना लस, सिरम इन्स्टिट्यूटची माहिती

पुणे / महाईन्यूज

करोना प्रतिबंध करणारी लस शोधण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. चालू वर्षाखेर अथवा पुढील वर्षात पहिल्या तीन महिन्यांत लस भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता सिरम इन्स्टिट्यूटनं व्यक्त केली आहे.

भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ लाखांच्या पुढे आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही लाखाच्या पुढे गेली. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. मार्च २०२१ पर्यंत भारताला करोनावरील लस मिळू शकते, असं ‘सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी पुण्यातील एका इंग्रजी वृत्तपत्रातून जाहीर केले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. करोनाचा फैलाव रोखणाऱ्या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर जगातील वेगवेगळया लस संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर करार केले आहेत.

सुरेश जाधव यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ‘अनेक कंपन्या करोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. भारतात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. दोघांवर तिसऱ्या फेजच्या लसीचा डोस देण्याची तयारी सुरु आहे. तर एकावर दुसऱ्या फेजचा डोस देण्याचा ट्रायल सुरु आहे. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, करोना विषाणूवरील लस पुढच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीपर्यंत तयार व्हायला हवा. जानेवारी २०२१ पर्यंत आपल्याला परिणाम दिसेल आणि २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत SARS-CoV-2 (करोना विषाणू) विरोधात लस तयार व्हायला हवी, असंही त्यांनी इंग्रजी वृत्तपत्राच्या माध्यमातून म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button