breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

राहुल गांधींनी सुचवलेल्या पुण्यातील उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध?

पुणे – पुण्यात काँग्रेसने निष्ठावंतांना बाजूला सारल्यामुळे पक्षाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बैठक घेऊन पक्षातील वाद सोडवावा लागला. आयात उमेदवार लादू नका हेच म्हणणं या बैठकीत मांडण्यात आलं.

पुणे लोकसभेच्या जागेसाठी सत्ताधारी भाजपपेक्षा काँग्रेसच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. मात्र या यादीत मूळ काँग्रेसीपेक्षा बाहेरील आयात उमेदवारांचीच चर्चा जास्त आहे. यामध्ये भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचं नाव काँग्रेकडून चर्चेत असतानाच अचानक प्रवीण गायकवाड यांचंही नाव पुढे आलं. या दोन्ही नांवाबद्दल काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना थेट पुण्यात येऊन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची मनधरणी करावी लागली.

त्यातच माजी आमदार उल्हास पवार यांनीही आता उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीचा पेच वाढला आहे. शिवाय त्यांनी थेट लेटरबॉम्ब टाकून काँग्रेसच्या आजच्या स्थितीवरच टीका केली. पुण्यातून काँग्रेस पक्षाच्या कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही एकदिलाने काम करून त्याला निवडून आणू, मात्र बाहेरील उमेदवार आमच्यावर लादू नका, अशा भावना यावेळी शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीत मांडल्या. त्यामुळे आता पुण्याच्या जागेचा तिढा आणखीच वाढला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button