breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्लास्टिक निर्मूलना विद्यार्थ्यांकडून पथनाट्याव्दारे जनजागृती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आरोग्य ही सेवा मोहिमे अंतर्गत प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलन व जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्य़ात आली. तसेच, पथनाट्य सादर करून जनजागरही करण्यात आला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत  आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलन व जनजागृतीपर विविध उपक्रम घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार काढलेल्या या प्रभात फेरीत नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू कन्याशाळा क्र. २ च्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच, नेहरूनगर परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊन प्लास्टिक कॅरिबॅग निर्मुलनाचा निर्धार केला.
यावेळी क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्याध्यापिका बी. डी. गिरी, एम. एम. जगताप, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एन. भोसले, आरोग्य निरीक्षक अंकुश धीटे, सुनील गायकवाड, विक्रम सवदे, महादू जाधव आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button