breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विद्यार्थ्यांचा कल वाणीज्य शाखेकडे

  • कल चाचणीचा निकाल जाहीर

 
मुंबई – यावर्षीचा दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी कॉमर्स घेण्याला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गेल्या वर्षी ललितकला म्हणजेच फाईन आर्टसकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल होता. यावर्षी 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली आहे. या कलचाचणीचा सविस्तर अहवाल महाकरिअरमित्रा डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. पुढच्या शैक्षणिक वर्षात कलचाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्दिष्ट्याने 2016पासून राज्य शासनाच्या 10 वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरु करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी कल चाचणी घेण्यात आली. दहावीच्या परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, असेही तावडे यांनी सांगितले. विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल ऑनलाईन प्राप्त करू शकतात. त्यासाठी महाकरिअरमित्रा डॉट इन या पोर्टलवर जाऊन मुखपृष्ठावर त्यांनी आपला हा क्रमांक टाकल्यानंतर त्यांना त्यांचा कल चाचणीचा अहवाल मिळू शकेल. हा अहवाल विद्यार्थी डाऊनलोड करु शकतात. याचसोबत त्यांचा कल ज्या क्षेत्रात आला आहे त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ ते पाहू शकतात.

विद्यार्थ्यांना कल अहवालाबाबत शालेय स्तरावर अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने 12 हजार शासकीय व शासन अनुदानित माध्यमिक विद्यालायांमधील एक मुख्याध्यापक व 2 शिक्षक यांना “अविरत’ या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यामतून प्रशिक्षित केले आहे. याद्वारे 41 हजार 607 शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. पुढील मार्गदर्शनासाठी विद्यार्थी पोर्टलवर दिलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यापूर्ण व्यावसायिक विकास संस्था केंद्रांशी संपर्क साधू शकतात.

पोर्टलवर 70 हजार अभ्यासक्रमांची माहिती 
शिवाय प्रत्येक क्षेत्रनिहाय माहितीपर व्हिडीओ आणि प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओ ही या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात. तसेच त्यांच्या आवड क्षेत्रानुसार त्यांच्या जिल्ह्यातील अभ्यासक्रमांचा शोध ही त्यांना या पोर्टलद्वारे घेता येऊ शकतो, पोर्टलवर 70 हजार हून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button