breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समिती सदस्यांना गोंधळात टाकून संतपीठाचे विषय मंजूर

– संतपीठाच्या विषयावरून राष्ट्रवादी करणार आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – टाळगाव चिखली येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने 40 कोटी रूपयांचा खर्च गृहीत धरला असताना, कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. हा विषय आज (शुक्रवारी) स्थायीच्या सभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांना अंधारात ठेवुन मंजुर करण्यात आला. स्थायी सभापतींनी विरोधीसह पक्षाच्या सदस्यांना गोंधळात टाकून विषय मंजूर केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक करीत आहेत. याबाबत नगरसचिवाकडे खातरजमा केली असता संतपीठाचा विषय मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवून हा विषय मंजूर केल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.  

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.21) रोजी मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.  भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा, वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण मिळावे, याकरिता महापालिका हे ‘संतपीठ’ उभारत आहे.  त्यामुळे टाळगाव चिखली परिसरात पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक १ मधील या संतपीठ उभारणीस १३ मे २०१५ रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली.

या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. त्याठिकाणी वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे हे संतपीठ आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाच्या इमारत बांधकामासाठी महापालिकेतर्फे ४० कोटी ६१ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली.

बी. के. खोसे यांनी ११.१६ टक्के जादा, व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी १४.७० टक्के जादा, तर एस. एस. साठे यांनी १६ टक्के जादा दराने निविदा सादर केल्या. बी. के. खोसे यांनी सादर केलेली वाढीव दराची निविदा स्वीकारण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार म्हणजेच ४४ कोटी ६१ लाख ७३ हजार ३२३ रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस ३६ लाख ९२ हजार २६४ आणि मटेरिअल चार्जेस १० लाख ३१ हजार ४७७ रुपये असे एकूण ४५ कोटी ८ लाख ९७ हजार ६४ रुपये इतका खर्च संतपीठ उभारणीसाठी येणार आहे.

दरम्यान, संतपीठाचा विषय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अंधारात ठेवुन मंजूर केला. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेस नगरसेवकांना हा विषय तहकूब असल्याचे विरोधी पक्षनेत्यांना सांगितले.  मात्र, पत्रकारांनी हा विषय मंजूर झाल्याचे विरोधी पक्षनेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे विरोधी पक्षनेत्यांनी संतपीठाचा विषय मंजूर केला की, तहकूब केला, याची चौकशी केली असता, हा विषय मंजूर झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विषय मंजूर केल्याने संतपीठावरुन आंदोलन करणार असल्याचे पावित्रा घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button