breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून वर्ध्यात रुग्णवाहिका जाळली

वर्धा – प्रेमप्रकरणातून वर्ध्यात चक्क रुग्णवाहिका जाळून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रुग्णवाहिका चालक हा रुग्ण आणण्यासाठी जात होता. यावेळी संघर्ष लोखंडे हा तीन युवकांसह रुग्णवाहिकेचा मालक तन्मय मेश्राम याच्या शोधात आला. यानंतर सरकारी रुग्णालयाजवळ फोनवर चालक बोलत असताना संघर्ष लोखंडे आणि त्याचे सहकारी रुग्णवाहिकेमध्ये चढले आणि तन्मय मेश्रामबाबत विचारू लागले.त्यावेळी तन्मय मेश्रामबाबत माहिती न मिळाल्याने संघर्ष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका चालक कुंदन कोकाटेवर हल्ला केला आणि त्याच्यासह रुग्णवाहिका घेऊन पुढं निघाले. दरम्यान कुंदनने गाडीतून उडी घेतली आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

या कालावधीत संघर्ष लोखंडेने साटोडा शिवारात नेलेली रुग्णवाहिका पेटवून दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा अशा प्रकार घडल्यामुळे तरुणांमध्ये पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.दरम्यान, शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.४ ़

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button