breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

साताऱ्याचे जवान संदीप सावंत दहशतवाद्यांशी लढताना शहीद

सातारा | महाईन्यूज

साताऱ्याचे जवन संदीप सावंत यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं आहे. नौशेरा या ठिकाणी ही घटना घडली आहे. संदीप सावंत हे सातारा जिल्ह्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते. २५ वर्षीय संदीप सावंत यांच्यामागे त्यांची पत्नी सविता या आहेत. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या व सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी सज्ज झाले.

दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे नेमकी संख्या समजू शकली नव्हती मात्र संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघा जवानांना वीरमरण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button