Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, संपूर्ण पक्ष घेऊन नवस फेडायला येईन : सुप्रिया सुळे

तुळजापूर |  “राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री होऊ दे. संपूर्ण पक्ष घेऊन तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला येईल”, असा नवस राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भवानी मातेच्या चरणी केला. “राज्यात आणखी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही. दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद वाढते आहे. आता पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”, असं सुप्रिसा सुळे बोलत होत्या. ‘बीबीसी मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. दुपारच्या सुमारास त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तुळजापूरच्या तुळजा भवानीचं दर्शन घेतलं. ‘यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे, महागाईपासून दिलासा मिळू दे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळू दे’, असं साकडं त्यांनी तुळजाभवानी चरणी घातलं.

सुप्रिया सुळे अनेक महिन्यांतून उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं. रविवारी दुपारच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री कधी होणार? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर, ‘या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी ज्योतिषी नाही. या प्रश्नाचं उत्तर जनता आहे. याचा निर्णय जनताच घेईन’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘चांगला पाऊस होऊ दे, बळीचं राज्य येऊ दे’, सुप्रिया सुळेंचं तुळजा भवानीला साकडं

अजितदादांच्या सासुरवाडीत सुप्रिया सुळे भावूक

“शरद पवार साहेब आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. अडचणीच्या काळात डॉ पद्मसिंह पाटील यांनी शरद पवार साहेबांना खूप साथ दिली. चार दशके चांगल्या-वाईट काळात ते एकत्र होते, हे विसरु शकत नाही, त्याचा आदरच आहे, तसेच तेर ही अजितदादाची सासुरवाडी आहे, त्यामुळे हे नाते घट्ट आहे, असं सांगताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या. यावेळी त्यांनी गतकाळातील जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१९ मध्ये आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या दोन्ही कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मात्र आज सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं. यावेळी सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button