breaking-newsमुंबई

गणेशोत्सवासाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण

कल्याण – कल्याण डोंबिवली शहरांत कोरोनाचा हाहाकार वाढत असून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० ते ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. यामध्ये शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे.

कल्याण डोंबिवलीत नियमित ३०० ते ४०० नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ३० हजार पार गेला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे हे समाधानकारक असलेतरी रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्याच्या तुलनेत 1.08 टकक्यांनी वाढले आहे. दुसरीकडे, कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील जोशीबाग येथे एक 40 जणांचा परिवार गणेश उत्सवात आरतीसाठी एकत्र आला होता. त्यातील एका मुलाला लागण झाली. त्यातून पुढे 40 पैकी 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या वृत्ताला केडीएमसी अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button