TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा भाजपा जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ

पुणेः कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे वातावरण आहे.

खासदार गिरीश बापट आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले. तसेच कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळीही सुरू जाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांची अचानक भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे म्हणाले, की दोन्ही आमदारांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणि सध्या आमचेच सरकार असल्याने मतदार आम्हाला साथ देतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button